Commercial Space Suitable For Hospital in Kolhapur

सोन्या मारुती चौक, शनिवार पेठेत जवळपास ४० वर्षे डॉ. कांचनकोटी यांचे नर्सिंग होम होते. बुधवार पेठ, शुक्रवार पेठ, केसापूर पेठ, सिद्धार्थ नगर, शनिवार पेठेतील दाटीवाटीने वसलेल्या मोठ्या लोकवस्तीला या हॉस्पिटलचा मोठा आधार होता. त्यांचीच जुनी इमारत उतरवून आम्ही प्रशस्त पार्किंग, फायर फायटिंग सुविधा , बॅकअप सह लिफ्ट , चोवीस तास पाणी अशा आधुनिक सोयींनी परिपूर्ण आकर्षक बिल्डिंग साकारली आहे रुद्र संकुल !.

पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर प्रत्येकी १७०० चौ. फु. चे दोन हॉल्समध्ये एक सुसज्ज हॉस्पिटल उभे राहू शकते. हे हॉल्स कमर्शिअल सॅक्शन्ड असून आपल्या सोयीने इंटीरिअर करता यावेत म्हणून पार्टीशन विरहीत ठेवले आहेत. महत्त्वाचे म्हणजे वर उल्लेख केलेल्या लोकावस्तीसाठी असे हॉस्पिटल अत्यंत गरजेचे आहेच शिवाय नदीपलीकडील वडणगे, आंबेवाडी , केर्ली , निगवे , चिखली , वरणगे पाडळी , शिये , भुये , आसुर्ले अशा शेकडो गावांमधील पेशंट्सना सेवा देता येईल. या सर्वांचा कोल्हापुरातील पहिला स्टॉप म्हणजे , सोन्या मारुती चौक ! दुधाळी पासून शाहूपुरीपर्यंत इतक्या मोठ्या लोकसंख्येला हॉस्पीटल उपलब्ध नाही. संधी घ्या .... एकदा बघायला या, आपल्या उज्वल भविष्याची मुहूर्तमेढ रोवा ! जी. एस. टी. नाही. माफक दरात कर्ज उपलब्ध.

Proposed Layout Plan

Rudra Sankul Kolhapur
Rudra Sankul Kolhapur